Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून 86 लाखांची फसवणूक करणारा अटकेत

पुणे : Pune Crime News | रियल वॉल्यु इंटरप्राईज (Real Value Enterprise) नावाने व्यवसाय असून चांगला व आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३२ जणांची ८६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) करणार्‍यास पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

निलेश गिरीश जोशी Nilesh Girish Joshi (वय ४५, रा. कोथरुड – Kothrud) असे त्याचे नाव आहे. त्याची पत्नी आश्विनी निलेश जोशी Ashwini Nilesh Joshi (वय ४१, रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रोहीत गुलाब खिलारे (वय ३१, रा. कर्वेनगर – Karvenagar) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६८/२३) दिली आहे. हा प्रकार मे २०२२ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश जोशी याने आपली रियल वॉल्यु इंटरप्राईज
(Real Value Enterprises ) या नावाने व्यवसाय असून ती एन एस बी, बी एस एफ मध्ये उत्तम प्रकारे उलाढाल करते. असे सांगून फिर्यादी व त्यांचे मित्र, नातेवाईक यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वार्षिक गुंतवणुकीबाबत चांगला व आकर्षक परतावा मिळवून देण्याची योजना सांगितली. फिर्यादी व त्यांचे मित्र, नातेवाईक अशा ३२ जणांकडून ८६ लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर परतावा व गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता फसवणूक (Fraud Case) केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन निलेश जोशी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station – 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mann Ki Baat 100 Episode | विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

Suryadatta Group of Institutes | महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे शहर पोलिसांच्या
गुन्हे शाखेकडून सव्वा 2 कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त (Video)