Pune Crime News | पुणे : मतभेद मिटवण्यासाठी बोलवून घेत अल्पवयीन मुलाला मारहाण, 6 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मतभेद मिटवण्यासाठी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला बोलावून घेत सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप शाळेच्या मुख्य गेट समोर घडली आहे. ही घटना रविवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सुरज दोरकर (वय-19 रा. हडपसर), वैष्णव साळुंखे (वय-18 रा. एच.बी.सी बिल्डींग, हराबाग चौक, शुक्रवार पेठ) व त्यांचे इतर चार साथीदारांवर आयपीसी 324, 143, 147, 149, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना रेणुका स्वरुप शाळेच्या मुख्य गेट समोर बोलावून घेतले. त्याठिकाणी फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवागाळ केली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या लाकडी पट्टीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. (Pune Crime News)

पैशांची मागणी करुन तरुणाला मारहाण

चतु:श्रृंगी : उसेने घेतलेल्या पैशांची मागणी करुन एका तरुणाला शिवीगाळ करुन हाताचा चावा घेत जखमी केले.
हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पादुका चौकाच्या पुढील वडारवाडी कडे जाणाऱ्या रोडवर घडला आहे.
याबाबत अक्षय लक्ष्मण खांडेकर (वय-23 रा. गणेश खिंड रोड, पुणे) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण सतिश घोणे (वय-24 रा. वडारवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अक्षय खांडेकर हे शिपने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात.
आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या स्टॉलवर जाऊन रिक्षाचे शिपचे उसने घेतलेल्या पैशांची मागणी केली.
रिक्षा पण तुमच्याकडे पैसे देखील तुमच्याकडे असे म्हणत फिर्य़ादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.
तसेच त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेऊन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका