Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘पोलिसातील मोठ मोठ्या अधिकाऱ्यांना ओळखतो, शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांना ओळखतो’ असे म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच पतीला शिवीगाळ केली. हा प्रकार वडगाव शेरी येथे सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता आणि शुक्रवारी (दि.24 नोव्हेंबर) रात्री साडे दहा वाजता पीडित महिलेच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी बहिण-भावावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत 37 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) रविवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन ज्योतीन्दर जयंतीलाल पटेल आणि त्याच्या बहिणीवर (रा. वडगाव शेरी) आयपीसी 354, 354अ, 509, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी वडगाव शेरी परिसरातील एकाच सोसायटीत राहतात. आरोपी तरुणीने फिर्यादी यांच्या पतीचा सोसायटीच्या पार्किंगमध्ये व्हिडिओ बनवला होता. याचा जाब विचारला असता आरोपी ज्योतीन्दर याने फिर्यादी यांना दम देऊन ‘पोलिसातील मोठ मोठ्या अधिकाऱ्यांना ओळखतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखतो, माझे कुणी काही करु शकत नाही’ असे म्हणत महिलेला अश्लील शिवीगाळ करुन त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. तसेच फिर्यादी यांच्या दंडाला ओढून गैरवर्तन करुन विनयभंग केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला देखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त