Pune Crime News | पुणे : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत असभ्य वर्तन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीला मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावरील कपडे ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला (Molestation Case). तसेच पतीला व महिलेला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.19) सायंकाळी पावणे सात ते साडेसात या दरम्यान डेक्कन परिसरातील मैदानात घडला आहे.(Pune Crime News)

याबाबत 32 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राजेश कंधारे, यश कंधारे व रितेश हगवणे
यांच्यावर आयपीसी 323, 354(अ), 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या पतीला हाताने मारहाण करत होते.
त्यावेळी फिर्य़ादी पतीला सोडवण्यासाठी गेले असता आरोपी त्यांच्या अंगावर धाऊन आले.
राजेश कंधारे याने महिलेला शिवीगाळ करुन अश्लील स्पर्श करुन अंगावरील कपडे ओढून विनयभंग केला.
तसेच फिर्य़ादी व त्यांच्य पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग

लोणीकंद : हाऊसकिपींगचे कॉन्ट्रॅक्ट काढून टाकल्याच्या रागातून तरुणाला भररस्त्यात मारहाण केली.
भावाला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणीचे केस ओढून अश्लील वर्तन करुन विनयभंग केला.
याप्रकरणी सुनील तांबे (रा. तांबेवाडी, केसनंद) याच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 27 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास घडला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On PSI | न्यायलायत रिपोर्ट सादर करण्यासाठी मागितली 1 लाखांची लाच, PSI सह एकाला अँटी करप्शनकडून अटक

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी बोट दुर्घटनेत करमाळा आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाला, बेपत्ता असलेल्यांची नावे समजली

Nilesh Lanke On EVM Strong Room | बारामतीपाठोपाठ अहमदनगर मध्ये ईव्हीएमच्या स्ट्राँग रूममध्ये धक्कादायक प्रकार, निलेश लंकेंनी पोस्ट केला व्हिडिओ (Video)

Indapur Bhima River | इंदापुरात भीमा नदीत बोट बुडाली, 6 जण बेपत्ता, 17 तासांनंतर बोट सापडली, पोलीस उपनिरीक्षक डोंगरे बचावले, एनडीआरएफचे शोधकार्य सुरू