Pune Crime News | पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 43 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेअर ट्रेडिंग करुन भरपूर पैसे कमावण्याच्या नादात एका हॉटेल व्यावसायिकाने तब्बल 43 लाख रुपये गमवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 18 फेब्रुवारी 2024 ते 14 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिकाच्या कॅम्प पुणे येथील घरात घडला आहे. याप्रकरणी सचिन वसंत केदारी (वय-52 रा. कॅम्प पुणे) यांनी मंगळवारी (दि.14) लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. (Cheating Fraud Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक तेरडींग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. तक्रारदार हे सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला.

त्यानंतर फिर्य़ादी यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअॅप जॉईन करण्यास सांगितले. ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादी यांनी अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण 48 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना 5 लाख रुपये मोबदला दिला. शेअर ट्रेडिंगमध्ये फायदा होत आहे असा विश्वास बसल्याने त्यांनी पैशाची गुंतवणूक सुरु ठेवली.
काही दिवसानंतर मात्र, त्यांना ते पैसे काढता आले नाहीत. त्यांनी सायबर चोरट्यांकडे संपर्क साधला,
त्यावेळी त्यांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले.
पैसे मिळणार नाहीत याची खात्री झाल्यावर फिर्य़ादी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)