Pune Crime News | पुणे: पहाटेच्या वेळी शंकरशेठ रोडवर कारचालकाला जबरदस्तीने लुटणार्‍या टोळीला खडक पोलिसांकडून 24 तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शंकरशेठ रोडवरून (Shankar Seth Road Pune) पहाटेच्या वेळी जाणार्‍या कारचालकास आडवुन जबरदस्तीने लुटणार्‍या (Robbery In Pune) टोळीचा खडक पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केला आहे. खडक पोलिसांनी (Khadak Police Station) कारचालकास लुटणार्‍या रिक्षाचालकासह चौघांना अटक (Arrest In Robbery) केली असून त्यांच्याकडून वाहने आणि चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

रिक्षा चालक रविंद्र मधुकर ढावरे Rickshaw Driver Ravindra Madhukar Dhaware (45, रा. शिवाजी आखाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ), प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे Prathamesh Alias Ptya Pramod Kamble (23, रा. म्हसोबा मंदिर जवळ, कासेवाडी), विशाल शंकर कसबे Vishal Shankar Kasbe (23, रा. कासेवाडी, पोलिस चौकी जवळ, कासेवाडी, पुणे) आणि सुशिल राजु मोरे Sushil Raju More (20, रा. 10 नंबर कॉलनी, कासेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात अब्दुल आहद हकीम खान (27, रा. सईदा कॉलनी, जटवाला रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अब्दुल खान हे त्यांच्या मित्राच्या आईवडिलांना घेण्यासाठी शंकरशेठ रोडवरून कारमधून जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षा चालक ढावरे याच्या रिक्षाला कार पाठीमागुन धडकली. त्यानंतर ढावरे आणि फिर्यादी खान यांच्यात वाद झाले.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या इतर आरोपींनी आणि रिक्षा चालक ढावरे यांनी आपआपसात संगणमत करून फिर्यादी खान यांना धमकावून त्यांच्याकडील 20 हजार रूपये तसेच 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. खडक पोलिस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हयाचा तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने (Sr PI Sunil Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav) व तपास पथकातील पोलिसांनी गुन्हयाचा तपास करून रिक्षा चालक ढावरे याला अटक केली. त्याच्याकडे इतर आरोपींबाबत चौकशी केली असता त्याने त्यांच्याबाबत काही एक माहिती नाही असे सांगितले.

खडक पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी शंकरशेठ रोड, सेव्हन लव चौक (Seven Loves Chowk) , नेहरू रोड आणि परिसरातील सुमारे 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज तपासले. त्यानंतर आरोपी हे स्थानिक असल्याची खात्री झाली. तपास पथकातील संदीप तळेकर आणि सागर घाडगे यांनी त्यांच्या गुप्ता बातमीदारामार्फत आरोपींची माहिती काढण्याचे काम सुरू केले. दरम्यान, एका बातमीदाराने आरोपींबाबत माहिती पोलिस अंमलदार तळेकर आणि घाडगे यांना कळवली. पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 हजार रूपये,
चोरलेला मोबाईल तसेच गुन्हयात वापरण्यात आलेली वाहन तसेच रिक्षा पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill),
सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) यांच्या मार्गदर्शनाखाली
खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत (PI Sampatrao Raut),
तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव,
सहाय्यक पोलिस निरीक्षक हणुमंत काळे (API Hanumant Kale), पोलिस अंमलदार अजीज बेग,
संदिप तळेकर, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे,
विशाल जाधव, लखन ढावरे आणि योगेश चंदेल यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | दंड माफ करण्यासाठी लाच घेताना महावितरणचा कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस