Pune Crime News | पुण्यात वकील तरुणीचा विनयभंग, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यामध्ये एका वकील (Lawyer) तरुणीचा भररस्त्यात विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल (Dayanand Irkal) यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime News) आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.13) रात्री पावणे नऊच्या सुमारास पत्रकार चौकाकडून एस.बी.रोडकडे जाणाऱ्या रोडवर घडला.

 

याबाबत 25 वर्षाच्या तरुणीने मंगळवारी (दि.14) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दयानंद इरकल, त्यांची पत्नी संध्या माने-इरकल Sandhya Mane-Irkal (रा. वडारवाडी) व अनोळकी महिला व पुरुषावर आयपीसी 354, 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास दुचाकीवरुन पूना हॉस्पिटलकडे (Poona Hospital) निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपी इरकल, त्यांची पत्नी, एक महिलेसह चौघे जण कारमधून निघाले होते. पत्रकार संघाकडे जाणाऱ्या पुलावर दुचाकीस्वार तरुणीने हॉर्न वाजविल्याने इरकल आणि कारमधील तिघे जण संतापले. त्यांनी गाडी बाजूला थांबवून फिर्यादी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

 

यावेळी दयानंद इरकल यांनी फिर्यादी यांच्यासोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला.
तर इरकल यांची पत्नी संध्या यांनी फिर्यादी यांना चपलेने मारहाण केली.
तसेच मोटारीतील एक महिला आणि एका व्यक्तीने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
महिलेच्या तक्रारीवरून चौघांच्या विरुद्ध विनयभंग, धक्काबुक्की, शिवीगाळ करुन धमकी (Threat) दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior Police Inspector Balaji Pandhare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर (PSI Sachin Gadekar) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune lawyer girl molested, NCP city vice president Dayanand Irkal FIR

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

Mumbai Heat Wave | मुंबई, पुण्यासह कोकणात पुढच्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश