Pune Crime News | पुणे : जबरदस्तीने गळ्यात मंगळसुत्र घालून केला अत्याचार ! बहिणीच्या इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो पाठवून केली बदनामी

Sahakar Nagar Pune Crime News | Pune: A youth sexually assaulted a 16-year-old girl through an acquaintance on social media

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | प्रवासात झालेली ओळख वाढवून इन्स्टाग्रामद्वारे ते जवळ आले. त्याने केलेल्या प्रपोजला तिने नकार दिला. तेव्हा त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावरुन तिची बदनामी केली. तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र टाकून तिच्यावर वारंवार अत्याचार (Rape Case) केला. ती त्याच्याकडे जाण्यास तयार नसताना तिच्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल फोटो पाठवून तिची बदनामी केली.

याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणावर पोक्सोसहीत विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ पासून १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची ट्रव्हल्समध्ये ओळख झाली. आरोपीने इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढविली. २ महिन्यांनंतर तिला प्रपोज केले. परंतु त्याला तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन त्याच्यावर ३०० रुपयांमध्ये नाईट फुल असे लिहून त्यावर फिर्यादीचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीकडे ५ हजार रुपयांची मागणी करु लागला. तिच्या घरी येऊन गेला. तेथे तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घातले. दोघेच घरात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिची इच्छा नसतानाही वारंवार तिच्याशी शरीर संबंध ठेवत होता. फिर्यादी या बहिणीकडे गेल्या असताना आरोपीने तिच्या बहिणीला फोन करुन तिला माझ्याकडे पाठव नाही तर मी तिचे अश्लिल फोटो इंन्स्टाग्रामवर व्हायरल करेल, अशी वारंवार धमकी दिली. बनावट इन्स्टाग्रामवरील फोटो बहिणीच्या इन्स्टाग्रामवर पाठवून फिर्यादीची बदनामी केली. बहिणीचा मोबाईल नंबर टाकून मी आत्महत्या करतो, अशी सुसाईड नोट लिहून तो फोटो इन्स्टग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts