Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात दररोज मोबाईल चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. एखादा मोबाईल चोरीला (Mobile Theft Case) गेला तर तो परत मिळण्याची शक्यता नसते. चोरीला गेलेला मोबाईल परत मिळत नसल्याने नागरिक पोलिसांना दोषी ठरवतात. परंतु स्वारगेट पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोबाईल चोरीचे रॅकेट शोधून काढले आहे. पुणे शहरातून चोरीला गेलेल्या मोबाईलचे कनेक्शन थेट चीनपर्यंत पोहचले आहे. हे मोबाईल नेपाळ मार्गे चीनला पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे (PI Geeta Bagawade) यांच्या पथकाने केली आहे.

स्वारगेट पोलिसांनी 47 मोबाईल आणि 3 लॅपटॉप जप्त करुन दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. इम्रान ताज शेख (वय-30 रा. अशरफ नगर, कोंढवा) आणि ओसामा शफिक शेख (वय- 22 रा. सय्यद नगर, हडपसर, मुळ रा. कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. इम्रानवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत.

आरोपींची मोडस ऑपरेंडी

इम्रान शेख मोबाईल चोर तर ओसामा शेख याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. इम्रान चोरी केलेले मोबाईल ओसामा याला देत होता. पुढे हे मोबाईल कुरिअरद्वारे ठाणे, मुंबई येथे पाठवले जात होते. किंवा तेथील एजंट पुण्यात येऊन मोबाईल घेऊन जात होता. या आरोपींनी मागील काही महिन्यांमध्ये 500 मोबाईल कुरिअरने पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. आदिब पटेल नावाच्या मुंबईतील व्यक्ती चोरीच्या मोबाईलमधील सर्व स्पेअर पार्ट काढून ते पुढे पाठवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुंबईतील एजंटचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच या आरोपींचा शोध लागले, असे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले.

स्पेअर पार्ट नेपाळ मार्गे चीनला

चोरलेले मोबाईल मुंबईत आल्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट काढले जायचे. त्यामुळे पोलिसांना चोरीला गेलेले मोबाईल ट्रेस होत नाहीत. मोबाईल मधील स्पेअर पार्ट काढल्यानंतर ते कलकत्ता, पश्चिम बंगाल मार्गे नेपाळला पाठवले जात होते. तेथून ते चीनला पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. चीन मध्ये पाठवलेले स्पेअर पार्ट पुन्हा नवीन होऊन विक्रीसाठी बाजारपेठेत येत असल्याचे देखील समोर आले आहे.

ओसामा असा आला धंद्यात

ओसामा शेख हा मुळचा जालना जिल्हायातील घनसांगवी गावचा आहे. याठिकाणी रफीक मियाँ नावाच्या पश्चिम बंगाल मधील व्यक्ती सोबत त्याची ओळख झाली. त्याने ओसामा याला या धंद्यात आणले. त्याला पुण्यात आणून त्याला सेटअप करुन दिले. ओसामामुळे अनेक मोबाईल चोर आणि दुकानदार पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. घरफोड्या करणाऱ्यांपेक्षा मद्यपी, रिकामे उद्योग करणाऱ्या मुलांना मोबाईल चोरी करण्यास सांगून ते मोबाईल कमी पैशात विकत घेऊन हा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्यानी-पराजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, सुजय पवार, नितीन क्षिरसागर, संदीप गोडसे, प्रतिक, पवार आणि गोडसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड, तोडफोड करताना बनवले रिल्स (Video)

Adani Group | अदानी ग्रुपच्या नावावर होणार सिमेंट इंडस्ट्रीचा मुकुट! नंबर-1 बनण्यासाठी काय आहे कंपनीचा प्‍लान?

Loni Kalbhor Pune Crime News | लोणी काळभोरमध्ये वाहनांची तोडफोड, दहशत परसवणाऱ्या टोळक्यांवर FIR