Pune Crime News | पुणे: रिल बनवण्याच्या नादात जीवाशी खेळ, उंच इमारतीवर तरुणाचा हात पकडून तरुणी हवेत लटकली; पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Pune Crime News | A case has been registered against 'those' young men and women in Pune who make dangerous reels by hanging from a height

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आजचं युग हे सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे. अनेकांच्या हातात सध्या स्मार्ट फोन आले आहेत. यावर फेसबुक आणि इंस्टाग्राम चालवत असतात. विशेषत: इंस्टाग्रामने तर लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कुठे रील बनवतील याचा नेम नाही. मात्र, रील बनवत असताना ती जागा कोणती आहे, आपल्या जीवाला धोका होईल का याचे भान राहत नाही आणि प्रसंगी जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना घडत असतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एका उंच इमारतीवर तरुणाचा हात पकडून एक तरुणी हवेत लटकत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.(Pune Crime News)

रील तयार करण्यासाठी ताकद आणि पकड तपासत असल्याचे व्हायरल व्हिडीओत लिहिल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Narayanan Temple Pune) असलेल्या एका उंच इमारतीवर ही तरुणी स्टंट करताना दिसत आहे. ही तरुणी इमारतीवरुन खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या तरुणाने तिचा हात पकडला आहे. चुकुन जर हात निसटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.(Pune Crime News)

हा व्हिडीओ पुणे-सातारा रोडवरील (Pune Satara Road) आहे. तरुण-तरुणी गोलाकार असलेल्या वास्तूवर चढून ही स्टंबाजी करताना दिसत आहेत. यावेळी आणखी एक तरुण दिसत असून तो व्हिडीओ काढत आहे. रील बनवण्याची पूर्ण तयारी करुन हे तरुण या वास्तूवर चढल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जीव धोक्यात घालून रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलीस काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | हडपसर: बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळला, खून की आत्महत्या?

Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke | अहमदनगर मधील निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली; जाणून घ्या

Sachin Tendulkar चा फेव्हरेट शेयर बनला रॉकेट, 5 कोटींची गुंतवणूक बनली 72 कोटी!

Chhagan Bhujbal – Sharad Pawar | छगन भुजबळांच्या परतीचे संकेत आहेत का?; शरद पवार म्हणाले – ‘माझी आणि त्यांची भेट…’

Total
0
Shares
Related Posts