Pune Crime News | अमेरिकन महिलेची साडे पाच हजार डॉलर्सची चोरी; पौड पोलिसांनी 12 दिवसांत लावला प्रकरणाचा छडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील ‘आत्‍मंथन’ या ठिकाणी पाहुणे म्हणून आलेल्या एका अमेरिकन महिलेचे 5943 अमेरीकी डॉलर चोरीला गेले होते. पौड पोलिसांनी (Paud Police) 12 दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून त्या महिलेला तिचे चोरी झालेले पैसे परत मिळवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी (Pune Rural Police) एकाला अटकसुद्धा केली आहे. भारतीय रुपयांनुसार याची किंमत सुमारे चार लाख सत्‍याऐंशी हजार तीनशे सव्‍वीस रुपये इतकी आहे. आपले चोरी झालेले पैसे परत मिळवून दिल्याबद्दल या महिलेने पौड पोलिसांचे आभार मानले आहे. (Pune Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीबी जमीना करीम (रा. अमेरीका, न्‍युयॉर्क, गयाना सिटी) असे या फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या फेब्रुवारीमध्ये पळसे येथील आत्‍मंथन या ठिकाणी पाहुण्‍या म्‍हणुन आल्‍या होत्‍या. यादरम्यान त्यांच्याकडील 5943 अमेरीकी डॉलर चोरीला गेले. त्यांनी हि गोष्ट व्‍यवस्‍थापनाला कळवली. यानंतर या महिलेच्या वतीने आत्‍मंथनचे सिक्‍युरीटी इंचार्ज भालचंद्र श्रीधर जाधव यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर पौडचे पोलिस स्‍थानकाचे पोलिस निरीक्षक मनोज यादव (PI Manoj Yadhav) यांनी तक्रार दाखल होताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आत्‍मंथन या ठिकाणी कामास असलेला विजय पटोई (रा. मुंबई टीटवाला) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या चोरीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी विजय कडुन 5943 अमेरिकी डॉलर हस्‍तगत केले. यानंतर न्‍यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन चलन परत केल्‍याबददल जमीना करीम यांनी पौड पोलिसांचे आभार मानले आहेत. (Pune Crime News)

पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) , अप्पर पोलिस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे
(Addl SP Mitesh Ghatte) , हवेली विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील
(SDPO Bhausaheb Dhole Patil) , पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे (API Bhalchandra Shinde), सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस नाईक नामदेव मोरे, दत्तात्रय अर्जुन, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख, आकाश पाटील, अक्षय यादव यांच्‍या पथकाकडून हि कारवाई करण्यात आली आहे.

Advt.

Web Title : Pune Crime News | pune police achievement foreign currency returned

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप

Maharashtra Budget 2023 | धनगर समाजासाठी मोठी घोषणा ! समाजाला 1000 कोटी रुपये, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज