Pune Crime News | 25 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तरूणानं केला पाठलाग, तिनं सांगितलं युवकाच्या पत्नीला अन्…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) –  (Pune Crime News) पाठलाग करत असल्याची माहिती पत्नीला दिल्याने एकाने दोन अल्पवयीन मुलांसह एका तरुणीच्या मदतीने संबंधित महिलेच्या घरी जाऊन महिलेचा भाऊ, आई व आणखी एका तरुणावर वार करत खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना खडकी (Khadki) येथे घडली आहे. पोलिसांनी दोघांना अटक (Police Arrest Two) केली आहे. pune police arrest two in attempt to murder case of khadki

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

प्रांजल उर्फ कुक्या शेलार (वय 21) आणि अंकुश लक्ष्मण वाघमारे (वय 43) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन साथीदार मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एका 25 वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश वाघमारे याने फिर्यादीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने 4 दिवसांपूर्वी पाठलाग केला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. तर भाऊ ऋषिकेश याला देखील ही घटना सांगितली. यावेळी भाऊ ऋषिकेश याने अंकुश याला पुन्हा असे न करण्याबाबत व घराकडे फिरू नको म्हणून सांगितले. हा राग आरोपीने मनात धरला.

त्यानंतर काल चौघेजण हातात लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या घरी आले.
त्यांनी भाऊ ऋषिकेश यास शिवीगाळ करत त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच एकाने कोयत्याने आणि दोन अल्पवयीन मुलांनी लाथा बुक्या घालून बेदम मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादिंची आई सोडवण्यास आली असता त्यांनाही या आरोपींनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर त्याच्या डोक्यात कोयता घातला असता तो त्याने चुकवल्याने बचावला.
पण, यावेळी या आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाच्या मित्रास देखील मारहाण करत खून करण्याचा प्रयत्न केला.
“उद्या तुम्हाला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत गोंधळ घालून पसार झाले.
पोलिसांनी शोध घेत या दोघांना आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदाराना पकडले.
अधिक तपास उपनिरीक्षक भोसले (Sub-Inspector Bhosle) या करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- pune crime news | pune police arrest two in attempt to murder case of khadki

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती