Pune Crime News | पुणे पोलिसांकडून शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात रा. नं. साळुंखेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर घोटाळा (Pune Shivaji Nagar Jumbo COVID Center Scam) प्रकरणात राजु नंदकुमार साळुंखेला (Raju Nandkumar Salunkhe) पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party (BJP) leader Kirit Somaiya) यांनी ट्विट करून दिली आहे. जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांचे पार्टनर आहेत. (Pune Crime News)

भाजप नेते किरीट सोमय्या ट्विटमध्ये म्हणतात की, पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात साळुंखेला अटक झाली आहे. आता संजय राऊत यांचे इतर 3 पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता (Dr. Hemant Gupta) आणि संजय शहा (Sanjay Saha) यांना अटक होणं बाकी आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचं कंत्राट दिले गेले होते. त्यामध्ये 3 रूग्णांचा मृत्यू झाला होता. (Pune Crime News)

किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना अटक करा अशी मागणी यापुर्वी
देखील केली होती. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजीत पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना देखील
अटक करण्याची मागणी सोमय्या यांनी केलेली आहे. राजीव साळुंखे, सुजीत पाटकर लाईफलाईन हॉस्पीटल
मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे Lifeline Hospital Management Services (LHMS) पार्टनर आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये राजीव साळुंखेच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.
यापुर्वीच सुजीत पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीविरूध्द मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केलेला आहे.

Web Title :  Pune Crime News | Pune Police Arrests Raju Nandkumar Salunkhe Partner of Lifeline Hospital Management Services in Shivajinagar Covid Center

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On MSRTC Bus | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प, मुंबई–ठाणे-पुणे अशा 100 शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

CM Eknath Shinde On Marine Drive | मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे