Pune Crime News | मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण (Noise Pollution) करणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell) कारवाईचा बडगा उगारला जात आहे. रात्री उशिरापर्य़ंत कायद्याचे उल्लंघन करुन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरु ठेवणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’वर (The Daily Restaurant & Bar) शनिवारी (दि.24) कारवाई केली आहे. या कारवाई (Pune Crime News) पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर जप्त केले आहे.

 

आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई केली जात आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नं.7 येथील ‘द डेली रेस्टॉरंट अँड बार’ मध्ये रात्री उशीरापर्यंत (Pune Crime News) साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे पेट्रोलींग करत असताना पथकाच्या निदर्शनास आले.

 

त्यानंतर पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु असल्याचे आढळून आले.
त्यानुसार पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले.
तसेच या हॉटेलच्या मॅनेजरवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत (Environment Protection Act)
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime Branch action against ‘The Daily Restaurant and Bar’ at Koregaon Park for playing loud music

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल