Pune Crime News | अडीच वर्षापासून फरार असलेल्या टांझानियाच्या तस्कराला गुन्हे शाखेकडून अटक, 23 लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महाशिवरात्री, शिवजयंती, संभाव्य व्हि.व्हि.आय.पी व्यक्तींचे दोरे तसेच कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.15) कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) केले. पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell) एकने एन.डी.पी.एस. गुन्ह्यात अडीच वर्षे फरार असलेल्या टाझानियाच्या तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 23 लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 116 ग्रॅम 300 मिलीग्राम कोकेन (Cocaine) जप्त केले. (Pune Crime News)

 

जेम्स डार्लिंगटन लायमो James Darlingtan Laymol (वय-29 रा. जाधवनगर, हांडेवाडी मुळ रा. टांझानिया-Tanzania) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एन.डी.पी.एस गुन्ह्यात मागील अडीच वर्षापासून फरार असणारा आरोपी जेम्स लायमो हा जाधवनगर येथे राहत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक एकला समजली. आरोपी हा दिल्लीत राहत होता तो मागील काही महिन्यापासून जाधववाडी येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला.

पथकाने घराची झडती घेतली असता 23 लाख 26 हजार रुपयांचे 116 ग्रॅम 300 मिलीग्रॅम कोकेन,
10 हजार रुपयांचे तीन मोबाईल, 200 रुपयांच्या छोट्या डब्या, 50 हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी,
रोख 6 हजार असा एकूण 23 लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास अंमली विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar) पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके,
मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, विशाल शिंदे,
संदेश काकडे, सचिन माळवे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime Branch arrests Tanzanian smuggler who has been absconding for two and a half years, seizes cocaine worth 23 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाहनात सापडली लाखोंची रक्कम, स्वारगेट परिसरातील घटना

Pune Traffic Updates News | शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’