Pune Crime News | पुणे स्टेशन पसिरातून 16 लाखाचा 82 किलो गांजा जप्त, सातारा आणि सोलापूरमधील एकाला अटक

ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोर क्राईम ब्रँचची कारवाई

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन : Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या (Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) पथकाने पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोरून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तबल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख 35 हजार 100 रूपये किंमतीचा गांजा (Ganja) जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Advt.

 

शशिकांत चांगदेव नलावडे Shashikant Changdev Nalavde (29, रा. मु.पो. धनगरवाडी, कोडोली, सातारा – Satara) आणि प्रतिक युवराज ओहोळ Pratik Yuvraj Ohol (19, रा. मु.पो. सालसे, ता. करमाळा, सोलापूर – Solapur) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आज (सोमवार दि. 29 मे 2023) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 मधील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) हद्दीत पेट्रोलिंग (Pune Police Petrolling) करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार योगेश मांढरे (Police Yogesh Mandhre) यांना आरोपी हे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली.

 

 

अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने सापळा रचुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख 35 हजार 100 रूपये किंमतीचा गांजा तसेच 20 हजार रूपये किंमतीचे 2 मोबाईल फोन आणि 3 हजार रूपयाच्या दोन बँग तसेच 1150 रोख असा एकुण 16 लाख 59 हजार 250 रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट (NDPS Act) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

आरोपी शशिकांत चांगदेव नलावडे हा समर्थ पोलिस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) दाखल असलेल्या
एका एनडीपीएस कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्हयात पोलिसांना वॉन्टेड होता.
सदरील कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घुले पोलिस अंमलदार योगेश मांढरे, पोलिस संतोष देशपांडे, पोलिस चेतन गायकवाड, पोलिस प्रशांत बोमदांडी, पोलिस संदीप जाधव, पोलिस मयुर सुर्यवंशी,
पोलिस महेश साळुंखे, पोलिस साहिलसय्यद शेख, पोलिस संदिप शेळके, पोलिस नितीन जगदाळे,
पोलिस युवराज कांबळे, पोलिस अझीम शेख आणि पोलिस दिनेश बस्तेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Pune Police Crime Branch Ganja Seized Railway Station
Shashikant Changdev Nalavde Pratik Yuvraj Ohol Satara Solapur Arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा