Pune Crime News | उरुळी कांचन येथील दारु अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | उरुळी कांचन परीसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर (Desi Daru) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) छापा टाकला. ही करवाई शिंदेवणे काळेश्वर गावातील राठोड वस्ती येथे सोमवारी (दि.27) करण्यात आली. या कारवाईत (Pune Crime News) 3 लाख 4 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

राठोड वस्ती येथे गावठी हातभट्टी दारुचा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. पोलिसांनी विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेली 3 लाख 2 हजार 500 रुपयांची 2,750 लिटर गावठी हातभट्टीची दारु, रोख रक्कम जप्त केली. तर याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यांतर्गत (Maharashtra Provisions Act) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत
जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे
(API Aniket Pote), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अमित जमदाडे यांच्या
पथकाने केली.

Web Title :-Pune Crime News | Pune Police Crime Branch raided a liquor den in Uruli Kanchan, seized 3 lakh worth of valuables

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना