Pune Crime News | वानवडी परिसरातील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, 25 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वानवडी परिसरातील घोरपडी गाव (Ghorpadi, Wanwadi) येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटक्याच्या (Mataka) जुगार अड्डयावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकला असून तब्बल 25 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी पत्र्याच्या शेडमधून जुगारातील रोक्क रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकुण 66 हजार 630 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

जुगार खेळाला आढळुन आलेल्यांसह पाहिजे असलेल्या आरोपी अशा एकुण 25 जणांविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम 12 (अ) अन्वये 25 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्यांना पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही जण बेकायदेशीररित्या घोरपडी गाव येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाला होती. (Pune Crime News)

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bharat Jadhav),
सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे,
तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, अमित जमदाडे यांच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकून कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime branch SS Cell raided a gambling den in Wanwadi area, action taken against 25 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास