Pune Crime News | आर्थिक व्यवहारातून अपहण केलेल्या व्यक्तीची पुणे पोलिसांकडून सुटका, चार जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीचे अपहरण (Kidnapping) करुन आठ लाखाची मागणी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी (Pune Police) अटक करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit -4) पोलिसांनी संयुक्त तपास करुन अपहरण झालेल्या व्यक्तीची 12 ते 14 तासात सुटका केली. तसेच चार जणांना (Pune Crime News) अटक केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

 

प्रविण शशिकांत पाटील उर्फ मोहमंद परवेझ शेख (वय-39 रा. लोहगाव बस स्टॉप जवळ, पुणे) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मेव्हण्याने वानवडी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी दत्तात्रय श्रीराम वारिंगे (वय-39 रा. तळेगाव दाभाडे), महेश ब्रह्मदेव जाधव (वय-32 रा. वाघेला पार्क कॉलनी, तळेगाव दाभाडे), सुभाष गोपाळ सोनजारी (वय-40 रा. नाचकेंड वस्ती, तळेगाव दाभाडे),रवि हनुमंत अंकुशी (वय-34 रा. सोनझरी वस्ती, तळेगाव स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण पाटील उर्फ मोहमंद शेख आणि आरोपी यांचे आर्थिक व्यवहार होते. आर्थिक व्यवहारतून आरोपींनी पाटील यांना वानवडी येथील फातिमानगर चौकातील श्री सागर हॉटेल येथे बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांना मारहाण करुन अपहरण करुन घेवून गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून आठ लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रार प्राप्त होताच आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान, आरोपींनी पाटील यांना तळेगाव दाभाडे येथे घेवून गेल्याची माहिती मिळाली. वानवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करुन चार जणांना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले (API Ajay Bhosale) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार संदीप शिवले (Senior Police Inspector Sandeep Shivale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव (PSI Jaywant Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे (PSI Ajay Shitole),
पोलीस अंमलदार संतोष नाईक, अतुल गायकवाड, सचिन बोराटे, निळकंठ राठोड, अनिकेत वाबळे,
अमोल जाधव गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
पोलीस अंमलदार हरिश मोरे, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, नागेशसिंग कुंवर, रमेश राठोड तसेच पिंपरी चिचंवड गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police freed a person who was abducted from financial transactions, four people were arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना