Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराकडून 9 कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मागील काही दिसांपासून पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने (Koyta Gang, Pune) दहशत माजवली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajnish Seth) यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस (Pune Police) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन (Pune Police Crime Branch) कडून मोठी करावाई करण्यात आली आहे. एका सराईत (Pune Crime News) गुन्हेगाराला अटक करुन त्याच्याकडून नऊ कोयते जप्त केले आहेत.

अक्षय अप्पाशा कांबळे (वय-27 रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 4 हजार 500 रुपये किमतीचे 9 कोयते जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनलच्या बाजूला करण्यात आली. आरोपी विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पुणे शहरात होत असलेली आंतरराष्ट्रीय जी-20 परिषद (International G-20 Conference) तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मोका मधील गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी (दि.11) रात्री ऑल-आउट ऑपरेशन (All-Out Operation) राबवण्यात आले.

कोबिंग ऑपरेशन (Combing Operation) दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला माहिती समजली की,
डायस प्लॉट झोपडपट्टी येथील कॅनलच्या बाजूला एकजण थांबला आहे.
त्याच्याकडे असलेल्या बारदाना पिशवीमध्ये लोखंडी कोयते आहेत.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या बारदाना पिशवीची तापसणी केली असता त्यामध्ये 9 कोयते आढळून आले.
पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे
(ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील
(Police Inspector Kranti Kumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते
(API Vishal Mohite), पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे व युनिट दोनच्या पोलीस अंमलदार यांनी केली.

Web Title :-  Pune Crime News | Pune police in action mode against Koyta gang, Crime Branch seizes 9 Koytas from Sarai criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा देशमुखांच्या भाजप प्रवेशाला विरोध, म्हणाले – ‘… म्हणून लातूरच्या प्रिन्सची भाजपात येण्याची इच्छा’

Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका