Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने (Koyta Gang, Pune) दहशत माजवली आहे. भरदिवसा टपरी चालक, हॉटेल मालक, रोडने जाणाऱ्या नागरिकांना धमकाण्यासाठी हातात कोयते, तलवारी घेऊन दहशत माजवली जात आहे. तसेच दुचाकी, चारचाकी गाड्यांवर कोयते मारुन नुकसान केले जात आहे. या पार्श्वभूमीवर (Pune Crime News) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट एकने (Pune Police Crime Branch) मोठी कारवाई करत कोयते विक्री करणाऱ्याकडून तब्बत 105 कोयते जप्त केले आहेत.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.9) बुधवार पेठ, बोहरीआळी येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास केली. या प्रकरणी हुसेन खोजेमा राजगरा Hussain Khojema Rajgara (वय-32 रा. हिल्स अ‍ॅण्ड डिल्स सोसायटी, उंड्री) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

कोयता गँगवर प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यासाठी सोमवारी पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबवले. यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार अजय थोरात व निलेश साबळे यांना माहिती मिळाली की, बोहरीआळी येथील ताहीरअली चिल या दुकानात हार्डवेअरचे सामान विक्रीच्या नावाखाली अनधिकृतपणे विना परवाना कोयते विक्री होत आहे. पथकाने रात्री साडेसातच्या सुमारास या दुकानावर छापा टाकून 45 हजार 800 रुपयांचे 105 कोयते जप्त केले. आरोपी हुसेन राजगरा याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टनुसार (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे
(ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले
(Senior Police Inspector Sandeep Bhosale), सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर
(API Ashish Kavathekar), पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), अजय जाधव,
रमेश तापकीर, पोलीस अंमलदार अजय थोरात, निलेश साबळे, अमोल पवार, दत्ता सोनवणे, राहुल मखरे,
विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Pune police in action mode against Koyta gang, raids directly on Koyta sellers; Crime Branch seized 105 Koyta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

Pune Pimpri Crime | भाऊ नाही बाबु बोलायचं असे म्हणत एकाला बेदम मारहाण, पिंपरीतील घटना