Pune Crime News | विश्रांतवाडी-धानोरी परिसरातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, 24 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime News |विश्रांतवाडी भागातील धानोरी परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. येथून 24 जणांना पकडण्यात आले आहे. तर मालकासह 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 वाहनांसह 72 हजार 980 रुपये रोकड असा ऐवज जप्त केला आहे. Pune Crime News | pune police raid gambling den in vishrantwadi dhanori area take action against 24 people

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जागा मालक सुनील दीपक टिंगरे आणि जुगार अड्डा मालक विशाल पारखे यांच्यासह खेळणाऱ्या 23 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती उपायुक्त पंकज देशमुख यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याचे पथक तयारकरून येथे छापा टाकण्यात आला.
यावेळी या कारवाईत जुगार चालवणारा विशाल पारखे तसेच जागामालक सुनील यांच्यासह जुगार खेळणाऱ्या 25 जणांना पकडले. या सर्वांवर गुन्हा दाखलकरून त्यांना अटक केली.
त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयाने त्यांची जामीनावावर सुटका केली आहे.
कारवाईत 72 हजारांची रोकड, दोन चारचाकी तर तीन दुचाकी व अकरा मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

शहरासह विश्रांतवाडी परिसरात वारंवार कारवाई करून देखील चोरून छुप्या मार्गाने अवैध धंदे सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मात्र या कारवाईत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालत दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Black Pepper | काळ्या मिरीचे छोटे-छोटे दाने खुपच फायद्याचे, वजन देखील कमी करतात, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे