पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बंदी असतानाही आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यासह (Gutkha) सुगंधी सुपारी आणि पानमसाल्याचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्याविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोहिम उघडली आहे. पुणे शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर आणि गुटख्याचा साठा करुन ठेवलेल्या गोदामावर पुणे पोलिसांनी छापा टाकून 3 लाखांचा मुद्देमाल (Pune Crime News) जप्त केला आहे. तर 32 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 22 जणांना अटक (Arrest) केली आहे.
पुणे पोलिसांनी शहरातील फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आणि साठा करुन ठेवणाऱ्यावर गुरुवारी (दि.2) छापेमारी केली. या कारवाईत 2 लाख 97 हजार 328 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 32 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन 22 जणांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)
फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीमधील बुधवार पेठतील पान टपरीवर छापा टाकून 3,124 रुपयांचा गुटखा जप्त करुन शमीम मोहम्मद हनिफ बागवान (वय-29 रा. मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जंगली महाराज रोडवरील यशराज पानश़प व संतोष पानशॉपवर डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) छापा टाकून 8,072 रुपयांचा विमल पान मसला व तंबाखु जप्त केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी यशराज पानशॉप मधील धनाराज परशराम घोरपडे (वय-45 रा. धायरीगाव) आणि संतोष पानशॉपमधील सुरेश खोपेकर (वय-40 रा. डेक्कन) यांना अटक केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police Station) एलआयसी लेन येथे छापा टाकून 5,515 रुपयांचा
मुद्देमाल जप्त करुन बबलु वासुदेव मश्रा (रा. विमाननगर), नंदकुमार बेद्रे (वय-68 रा. येरवडा), रमेश सामलेटी,
अनिश साळुंखे (वय-22) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नाना पेठेतील ए डी कॅम्प चौकातील पान टपरीवर समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) रात्री
साडेसातच्या सुमारास छापा टाकला.
त्यावेळी पान टपरीमधून 20 हजार 950 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त केला.
पोलिसांनी आरीफ तांबोळी (वय-52 रा. भवानी पेठ), साकीर अन्सारी या दोघांना अटक केली आहे.
तर सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnagar Police Station) पद्मावती येथील दादा स्नॅक्स सेंटरवर छापा
टाकून 1,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कुमार संजय हातेकर (वय-28 रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोन ठिकाणी छापे टाकून 44 हजार 228 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आंबेगाव येथील सुपर मार्केट आणि कात्रज कोंढवा रोडवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत काळुराम बद्रीलाल उणेचा (वय-41) आणि आण्णासाहेब मिटकरी यांना अटक केली आहे. आरोपींकडून भेसळयुक्त आर एम डी गुटख्याचा आणि पानमसाल्याची साठा जप्त केला.
दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) हजरत जनरल स्टोअर्स याठिकाणी छापा टाकून 3,121 रुपयांचा गुटखा जप्त करुन महंमद रफिख इमाम सय्यद (वय-39) याच्यावर गुन्हा दाखल केल आहे..
वारजे पोलिसांनी (Warje Police Station) स्पेन्सर चौकातील शिवकमल पानशॉपवर कारवाई करुन
7,380 रुपयांचा गुटका जप्त करुन टपरी मालक इंद्रजीत किसन राऊत (वय-50 रा. शिवणे) याच्यावर गुन्हा
दाखल केल आहे.. उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police Station) शिवणे येथील प्लेझर ट्रो
पान शॉपमध्ये कारवाई करुन रमाकांत प्रजापती आणि राकेस पोखरणा यांना अटक केली अटक करण्यात
आलेल्या आरोपींकडून 71 हजार 616 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) राम बहादुर गुप्ता (वय-27 रा. कोथरुड) याला अटक
करुन 7,550 रुपयांचा गुटखा जप्त केला.
तर सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police Station) आर एस पानशॉपमधून 14 हजार 439 रुपयांचा
गुटखा जप्त करुन मनोज राम मोहन कुमार (वय-32) याला अटक केली.
चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) 24 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गणेश दतुराम मंजुळकर (वय-33 रा. पाषाण) याला अटक केली.
चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police Station) दोन ठिकाणी छापे टाकून 10 हजार 304 रुपयांचा
विमल पानमसाला जप्त केला. खराडी येथील कारवाईत सलमान लालमोहम्मद शेख (वय-25) याला अटक केली.
तर वडगाव शेरी येथील जमीर पानशॉपचा मालक जमीर साहेबलाल शेख (वय-22 रा. माळवाडी) याला अटक केली.
विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) वाघोली रोड आणि मंत्री आयटी पार्क समोरील पानशॉपवर कारवाई करुन 20 हजार 469 रुपयांचा गुटखा जप्त करुन मुकेश रमेश गुप्ता (वय-34),
राहुल गणेश ठोकळ (वय-31) यांना अटक केली.
येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) आयटी पार्क येथे कारवाई करुन 10 हजार 38 रुपयांच्या प्रतिबंधित सिगारेट व गुटखा जप्त करुन अब्दुल रेहमान मोहमद मकर्ला (वय-45 रा. येरवडा) याच्यावर
गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) 10 हजार 252 रुपयांचा
गुटखा जप्त करुन कबीर अब्बास (वय-28) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी हि कारवाई टिंगरेनगर येथे केली.
मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून 16 हजार 900 रुपयांचा
प्रतिबंधित सिगारेट, गुटखा जप्त केला. या कारवाईत संतोष शंकर इंगवले (वय44),
सोहनलाल दुर्गाराम चौधरी (वय-35) या दोघांना अटक केली.
लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) उरूळी कांचन येथील मातोश्री पानश़ॉपवर छापा
टाकून 930 रुपयांचा गुटखा जप्त केला.
मांजरी बुद्रुक येथील एका पानशॉपवर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) कारवाई करुन संतोष
दत्तात्रय थेऊरकर (व-52) याला अटक करुन 10 हजार 809 रुपयांचा गुटखा जप्त केला.
तर साडेसतरा नळी येथील शुक्ला पानशॉप येथे केलेल्या कारवाी 2,717 रुपयांचा गुटखा जप्त करुन उमाशंकर शिवप्रसाद गुप्ता (वय-27 रा. मुंढवा) याला अटक केली आहे.
Web Title :- Pune Crime News | Pune police raided illegal gutkha sellers in Faraskhana, Deccan, Shivajinagar, Samarth, Sahakarnagar, Bharti Vidyapeeth, Dattawadi, Warje, Uttamnagar, Kothrud, Sinhagad, Chatu:Sringi, Chandannagar, Airport, Yerawada, Vishrantwadi, Mundhwa, Loni Kalbhor, Hadapsar area. 22 people arrested
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update