Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोल्हापूर जिल्हयातील दरोडेखोरांच्या टोळीला अटक ! 25 लाखाचा माल जप्त, सातारा येथून सोनं-चांदी लुटलं होतं; जाणून घ्या स्टोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे कुरियर सातारा येथून पुण्याकडे (Satara To Pune) घेऊन निघालेल्यांना मौजे काशिळ गावच्या हद्दीत अडवून त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून लुटणार्‍या (Robbery In Satara) कोल्हापूर येथील दरोडेखोरांच्या टोळीला (Criminals In Kolhapur) पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB Pune Rural) आणि यवत पोलिसांनी (Yavat Police Station) सापळा रचुन अटक केली आहे. अटक केलेल्या 5 जणांच्या टोळीकडून तब्बल 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज (Ornaments Of Gold And Silver) जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सरफराज सलीम नदाफ Sarfraz Salim Nadaf (34), मारूती लक्ष्मण मिसाळ Maruti Laxman Misal (31, दोघे रा. कुंभाजे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर – Hatkanangale), सुरज बाजीराव कांबळे Suraj Bajirao Kamble (24), करण सायजी कांबळे Karan Sayaji Kamble (23, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि गैरव सुनिल घाडगे Garav Sunil Ghadge (23, रा. मिनचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेवुन सातार्‍याहून पुण्याकडे निघाले होते. (Pune Crime News)

सातारा तालुक्यातील मौजे काशिळ गावाच्या हद्दीतील ब्रिजवर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या इतरांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील दागिने लुटले होते. आरोपी हे यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे (Pune Solapur Highway) रोडने इनोव्हा गाडीतून जात असल्याबाबतची माहिती वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे (Police Inspector Hemant Shendage) यांना दिली होती. पीआय हेमंत शेंडगे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे (API Sunil Lokhande), सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे (API Wable) आणि इतर पोलिसांचे पथक तयार करून कासुर्डी टोलनाका (Kasurdi Toll Naka) येथे नाकेबंदीसाठी पाठविले. नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाक्यावर आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले.

 

 

पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 18 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 79.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली इनोव्हा गाडी, छर्‍याचे पिस्टल, चाकु, मोबाईल आणि इतर ऐवज असा एकुण 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. अटक आरोपींना सातारा पोलिस (Satara Police) दलातील बोरगाव पोलिस स्टेशनच्या (Borgaon Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

 

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal),अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे (Addl SP DCP Anand Bhoite),
उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव (SDPO Swapnil Jadhav), पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक सिध्द पाटील (PSI Siddha Patil), पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहटे (PSI Avinash Lohte), पोलिस हवालदार गणेश कर्चे,

 

पोलिस हवालदार राजीव शिंदे, पोलिस हवालदार रविंद्र गोसावी, पोलिस हवालदार संदिप देवकर,
पोलिस हवालदार सचिन घाडगे, पोलिस हवालदार विजय कांचन, पोलिस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलिस
हवालदार राजु मोमीन, पोलिस हवालदार अजय घुले, पोलिस हवालदार प्रमोद नवले,
पोलिस नाईक अजित इंगवले, पोलिस नाईक नारायण जाधव, पोलिस नाईक नुतन जाधव, पोलिस
नाईक दामोदर होळकर, पोलिस नाईक पांडुळे, पोलिस अंमलदार सोमनाथ सुपेकर,
पोलिस अंमलदार सागर क्षीरसागर, पोलिस अंमलदार तात्याराम करे, पोलिस अंमलदार टकले, पोलिस
अंमलदार समीर भालेराव, पोलिस अंमलदार धिरज जाधव आणि
पोलिस अंमलदार कांबळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune rural police arrested a gang of robbers in Kolhapur district!
25 lakhs seized, gold and silver looted from Satara; Know the story

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

Maji Sainik Sanghatana | माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात

Ajit Pawar | ‘शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच भू…भू…भू.. करतंय’, अजित पवारांची शिवसेना नेत्यावर विखारी टीका