Pune Crime News | सराफा व्यावसायिकाला लुटणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड, 6 लाख 58 हजारांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापूर वाडा गावच्या हद्दीतील आकांक्षा ज्वेलर्स चे (Akanksha Jewellers) मालक यशवंत राजाराम महामुनी हे 5 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी जात होते. घरी जाताना त्यांनी दुकानातील सोने-चांदीचे दागिने (Gold – Silver jewellery) एका बॅगमध्ये भरुन घेऊन जात होते. त्यावेळी कोंढणपूर रोडवर दोन पल्सरवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याकडी 6 लाख 58 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग पळवून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) चार जणांना अटक करुन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

रोहित उर्फ बाबा प्रकाश साठे (वय-25 रा. सहकारनगर, पुणे), निखिल भगवंत कांबळे (वय-28 रा. बिबवेनगर, अप्पर, पुणे), निलेश दशरथ झांजे (वय-25 रा. वडगाव झांजे ता. वेल्हे), शफीक मकसुद हावरी (वय-19 रा. कुंभारवाडा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून चोरी केलेले साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व तीन किलो चांदीचे दागिने असा एकूण 6 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. (Pune Crime News)

राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाने सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी दोन पल्सल दुचाकीवरुन शिवापूर-राठवडे-आंबवणे मार्गे कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केला आहे. त्यानुसार तपास करत असताना सराईत गुन्हेगार निलेश पांडुरंग डिंबळे (रा. कल्याण ता. हवेली), रोहित साठे, निखील कांबळे, साहील पटेल, निलेश झांजे यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर पुणे शहर (Pune City Police) व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे
(Addl SP Anand Bhoite), उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे
(Sub Divisional Police Officer Tanaji Barde) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), राजगड पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप (PI Annasaheb Gholap), एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे
(API Netaji Gandhare), पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी (PSI Pradeep Chaudhary), अभिजीत सावंत
(PSI Abhijit Sawant), पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव,
मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजित भुजबळ, राहुल घुबे, दत्ता तांबे, निलेश शिंदे, अमोल शेडगे, तुषार भोईटे,
मंगेश भगत, धिरज जाधव, अक्षय सुपे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ
(API Nitin Khamgal), पोलीस अंमलदार राहुल कोल्हे हे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना