Pune Crime News | ससूनमधील वॉर्ड नंबर 16 म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांचे दुसरे घर, अनिल भोसले, रुपेश मारणेसह अनेक अट्टल गुन्हेगारांचा ससूनमध्ये मुक्काम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ड्रग्स माफिया (Drug Mafia) ललित पाटील (Lalit Patil) याने ससून हॉस्पिटलमधून पलायन केल्यानंतर ससुनचा वॉर्ड क्रमांक 16 हा चर्चेत (Sasoon Hospital Drug Racket Pune) आला आहे. येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) श्रीमंत आरोपी आजारपणाचे कारण देऊन पैशांच्या जोरावर ससूनच्या वॉर्ड क्रमांमक 16 मध्ये मागील अनेक दिवसांपासून मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ससून हॉस्पिटल हे श्रीमंत आरोपींचे दुसरे घर बनल्याचे दिसत आहे. (Pune Crime News)

येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे महिनोनमहिने ससूनमध्ये पाहूनचार घेत असतात. कारागृहात अनेक गंभीर आजारांचे रुग्ण असताना देखील त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी मर्जीतील आणि श्रीमंत आरोपींना ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पाठवले जाते. त्यासाठी कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं.

ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये राहूनच ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यासाठी त्याला मोबाईल फोन आणि इतर आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळत होत्या. एवढंच नाही तर तो हॉस्पिटलमध्ये कोट्यावधीचा अंमली पदार्थ जवळ बाळगून होता. याला पोलिसांचा देखील छुपा आर्थिक पाठिंबा असल्याचे बोलले जातेय. (Pune Crime News)

कोणते आरोपी ससूनमध्ये तळ ठोकून आहेत…

 1. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. परंतु ते गेल्या 130 दिवसांपासून येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये मुक्कामी आहेत.
 2. पुण्यातील रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाणा हा कॉसमॉस बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहे. त्यावर ईडीने देखील कारवाई केली होती. तो देखील 50 दिवसांपासून ससूनमध्ये आहे.
 3. खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेला
  हेमंत पाटील मागील 41 दिवसांपासून ससूनमध्ये राहात आहे.
 4. मटका किंग विरल सावला हा मागील 247 दिवसांपासून ससूनमध्ये तळ ठोकून आहे.
 5. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा पुतण्या रुपेश मारणे हा 47 दिवसांपासून ससूनमध्ये पाहूणचार घेत आहे.
 6. कुख्यात गुंड हरिदास साठे हा 72 दिवसांपासून ससूनमध्ये मुक्कामी आहे.
 7. ड्रग्स माफिया ललित पाटील हा देखील जून महिन्यापासून ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये राहात होता.
  येरवडा कारागृहातील अधिकारी आणि डॉक्टर यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर त्याला
  ससूनमध्ये आणण्यात आलं होतं. ससूनमध्ये उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचे समोर
  आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं हार्नियाचे ऑपरेशन करण्याची शिफारस ससूनमधील डॉक्टरांनी केली होती.
  आणि त्याच दरम्यान ललित पाटील याने पलायन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला