पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लॉजवर नेऊन तिच्यावर नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा ताबा घेऊन त्यावरुन इतर अनोळखी इंस्टाग्राम युझरशी अश्लिल चॅट करुन तिचे त्याच्याकडे असलेले नग्न व अर्धनग्न व पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल करुन तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) या नराधम तरुणाला अटक केली आहे. (Rape Case)
श्रीयश रुपेश पतंगे Shriyash Rupesh Patange (वय २१, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०२४ चे पहिला आठवडा ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलीशी श्रीयश पतंगे याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला वेळोवेळी लॉजवर घेऊन जाऊन तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तिच्या इंस्टाग्राम युजर आयडी त्याच्या मोबाईल फोनमध्ये लॉग इन करुन घेतले. फिर्यादी यांच्या मुलीचा फोन तिच्या आईच्या ताब्यात असताना पतंगे याने पिडीताचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन इतर अनोळखी इंस्टाग्रामवर पिडिताशी चॅट करीत असल्याचे भासवले. त्यात अश्लिल चॅट व शिवीगाळ केली. तिचे नग्न, अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेले फोटो व्हायरल केले. ते पिडिताचे इंस्टाग्राम युजर आयडी यावर पाठवून तिला धमकावून तिचेकडे पैशांची मागणी केली. तिच्या इंस्टाग्रामवर क्यु आर कोड पाठवून ३०० रुपये पाठवण्याची मागणी केली. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके (PI Arun Ghodke) तपास करीत आहेत.