Wanwadi Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wanwadi Pune Crime News | अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार हडपसर भागात मागील एक वर्षापासून ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीच्या आईने (वय-50) शनिवारी (दि.11) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनुपकुमार गोरख यादव Anupkumar Gorakh Yadav (वय-26 रा. हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन/जे/3, 354(अ), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री केली. तिच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन त्याने ति राहत असलेल्या इमीरतीच्या टेरसवर घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती सहा महिन्याची गरदोर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Wanwadi Pune Crime News)

घरात घुसून महिलेचा विनयभंग

कोंढवा : घरात घुसून महिलेसोबत झटापट करुन तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला.
हा प्रकार शुक्रवारी (दि.10) रात्री साडे अकराच्या सुमारास कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथे घडला आहे.
याबाबत 35 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरून बगडम भोईटे (वय-28 रा. कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि फीर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी रात्री आरोपी महिलेच्या घरी आला.
त्याने दरवाजा वाजवल्याने महिलेने दार उघडले. दार उघडल्यानंतर आरोपी थेट घरात घुसला.
त्याने महिलेसोबत झटापट करुन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.
तसेच शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol’s Statement To Punekar | पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ
यांचे पुणेकरांना निवेदन; म्हणाले – ‘पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविणार’

Pravin Tarde-Murlidhar Mohol | परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच…, मित्र मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंनी गाजवली सभा