Pune Crime News | पुणे-सोमवार पेठ क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – 9 टक्के मोबादला देण्याच्या आमिषाने 81 लाख 50 हजाराची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | इनकम रूट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅन्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस (Incomeroute – Investment & Fianancial Services) या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा टीडीएस (TDS) वजा करून 9 टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून 81 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी समर्थ पोलिस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) एकाविरूध्द चिटींगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

ज्ञानेश्वर लक्ष्मण घाडगे Dnyaneshwar Laxman Ghadge (ऑफिस नंबर 209, बी-विंग, रोड नंबर 22, वागळे इस्टेट, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एप्रिल 2022 ते आजपर्यंत ज्ञानेश्वर लक्ष्मण घाडगेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना इनकम रूट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅन्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीत पैसे गुंतविल्यास दरमहा टीडीएस वजा करून 9 टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीला मोठी रक्कम गुंतविण्यास भाग पाडून आजपर्यंत 81 लाख 50 हजार रूपये व त्यावरील मोबदला परत न करता फसवणूक (Fraud Case) केली. तक्रार अर्जाची चौकशी करून सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

समर्थ पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक मिरा त्र्यंबके (PSI Meera Trimbake)
अधिक तपास करीत आहेत. सदरील गुन्हा हा सिटी सर्व्हे नंबर 405 ए, सोमवार पेठ येथे घडला आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune-Somwar Peth Crime News : Samarth Police Station – Fraud of 81 lakh
50 thousand FIR On Dnyaneshwar Laxman Ghadge of Incomeroute – Investment & Fianancial Services

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा