Pune Crime News | पुणे : दोन दिवसांच्या अंतराने उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे साडेतीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याने दोन दिवसांच्या अंतराने पाठोपाठ आत्महत्या (Suicide In Pune) केली आहे (Newly Married Couple Death). ही घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील (Bhor Taluka News) केळवडे परिसरात आणि पिरंगुट येथे घडली आहे. (Pune Crime News)

धीरज संभाजी कोंडे (29) आणि समृध्दी धीरज कोंडे (22, दोघे रा. केळवडे, ता. भोर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. डिसेंबर 2022 मध्ये बावधन येथे समृध्दी ढमालेचे धीरज कोंडे याच्याशी लग्न झाले होते. समृध्दीने कॉम्प्युटर एज्युकेशन पुर्ण केले होते तर धीरज हा कृषी शाखेचा पदवीधर होता. 8 दिवसांपुर्वी समृध्दी माहेरी म्हणजेच बावधन येथे गेली होती. त्यानंतर तिने पिरंगुट येथे नातेवाईकाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

समृध्दीने आत्महत्या केल्यामुळे धीरजला मोठा धक्का बसला.
त्यानंतर त्याने गुरूवारी (दि. 30 मार्च) केळवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अवघ्या 2 दिवसांच्या अंतराने पत्नी आणि पतीने पाठोपाठ आत्महत्या केल्याने भोर तालुक्यातील केळवडे गावावर शोककळा पसरली आहे. मात्र, दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

Web Title :- Pune Crime News | Pune: Suicide of highly educated newly married couple two days apart

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट