Pune Crime News | फिरण्यासाठी आलेल्या गुजरातमधील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातील घटना

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फिरण्यासाठी आलेल्या गुजरात राज्यातील बडोदा येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील नाणेघाट (Naneghat) येथे शनिवारी (दि.23) रात्री घडली. संजय बालमुकुंद केडिया Sanjay Balamukund Kedia (वय-42 रा. ए. 701, सेलिब्रिटी लक्झरीया मोटरचे मागे, सनफर्मा रोड, बडोदा, गुजरात) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत प्रकाश नरोत्तमल बैगानी (रा. कल्पतरु हार्मनी, वाकड, पुणे) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात (Junnar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय आणि प्रकाश हे दोघे नाणेघाट येथे फिरण्यासाठी आले होते. ते एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. दोघे रिसॉर्टच्या मागे असलेल्या ओढ्याच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर संजय यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार (PI Narayan Pawar) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’

गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी परराज्यातील टोळी गजाआड, हडपसर पोलिसांकडून झारखंड,
पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशातील चोरट्यांकडून महागडे मोबाईल जप्त