Pune Crime News | पुणे-वारजे माळवाडी क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | आण्णा डोळसे कुठे आहे, असे विचारल्यानंतर माहिती नसल्याचे सांगितल्यावरुन गुंडांच्या टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याबाबत चेतन मारुती शेडगे Chetan Maruti Shedge (वय २४, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव संजय शेळके Gaurav Sanjay Shelke (वय २१, रा. वारजे), अभिषेक नवनाथ संकट Abhishek Navnath Sankat (वय १९, रा. रामनगर, वारजे), सचिन शंकर दळवी Sachin Shankar Dalvi (वय २३, रा. दांगट पाटीलनगर) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार ओंकार मांढरे, रोहन पाटोळे, साहील बल्लाळ, आमिश धावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे हे १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता
रामनगरमधील प्रणव सुपर मार्केटजवळ बसले होते.
यावेळी आरोपी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन तेथे आले. सचिन दळवी याने फिर्यादींना आण्णा डोळसे कुठे आहे,
असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.
फिर्यादी व आरोपीच्या टोळीतील वादामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या हातावर, दंडावर, कमरेच्या वर तलवारीने वार
करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे याने अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जखमी करण्यात आले.
पोलीस निरीक्षक बागवे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station – Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil |डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

CM Eknath Shinde On Kolhapur | कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी, उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचसाठी पाठपुरावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे