Pune Crime News | कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुक्का पार्लरवर ‘सासु’चा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील गेरा लेजंट इमारतीमधील (Gera Legend Building) रॉक वॉटर या रुफ टॉप हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध हुक्का बारवर (Hookah Bar) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Crime Branch SS Cell) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) सोमवारी (दि.23) केली.

 

कोरेगाव परिसरातील रुफ टॉप हॉटेलमध्ये (Rooftop Hotel) अवैध हुक्का बार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवुन हॉटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी हुक्काबार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधील तंबाखुजन्य हुक्क्याचे फ्लेवर, हुक्क्याचे साहित्य असा एकूण 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), अनिकेत पोटे (API Aniket Pote),
पोलीस अंमलदार अजय राणे, आण्णा माने, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | raid on hookah parlor in Koregaon Park police station limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका