Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील स्पा सेंटरवर छापा; 4 परदेशी महिलांसह 7 जणींची सूटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील स्पा सेंटरवर (Spa Centres In Koregaon Park) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) छापा टाकून 4 परदेशीसह 7 महिलांची सुटका केली आहे. सदरील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय (Prostitution Racket) सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

या प्रकरणी स्पा मॅनेजर उत्तम शेषेराव सोनकांबळे Uttam Sesherao Sonkamble (38, रा. खराडी) आणि स्पा चालक गजानन दत्ता आडे Gajanan Dutta Aade यांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून मॅनेजर उत्तम सोनकांबळे याला अटक करण्यात आली आहे.

 

कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोडवरील विद्युतनगर सोसायटीच्या प्लॉट नं. 2 येथील द सिग्नेचर थाई स्पा सेंटरमध्ये मुलींना वेश्या व्यवसायासाठी ठेवुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (Pune Police) सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरील स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवुन खात्री करण्यात आली. त्यानंतर तेथे तात्काळ छापा टाकला. त्यावेळी 4 परदेशी आणि 3 भारतीय अशा एकुण 7 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा सेंटरमधून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरा फरार आहे. दोघांविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bhart Jadhav), सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote),
पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, रेशमा कंक, अमित जमदाडे, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Raid on spa center in Koregaon Park area; 7 including 4 foreign women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाच्या धडकेने वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

Salman Khan | पुन्हा एकदा सलमान खानला ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी; “अगली बार बडा झटका देंगे, ….”

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…