
Pune Crime News | हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी निघालेल्या तरुणीवर बलात्कार, बॅकयार्ड कॅफेच्या मॅनेजरसह तिघांविरूध्द गुन्हा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमानतळ परिसरातील कॅफे मध्ये पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28 सप्टेंबर) रात्री घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)
दत्तात्रय देविदास खरात Dattatraya Devidas Kharat (वय-27 रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे), मदन नरसींग राठोड Madan Narsingh Rathod (वय-31 रा. माथे आळी, लोहगाव, पुणे) आणि बॅकयार्ड कॅफे चा मॅनेजर (Cafe Viman Nagar Pune) यांच्यावर आयपीसी 376, 376 (अ), 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे (Viman Nagar Police Station). याबाबत 32 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दत्तात्रय खरात आणि मदन राठोड यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमध्ये ‘बॅकयार्ड’ नावाचा कॅफे आहे. पीडित तरुणी ही तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत बॅकयार्ड कॅफे हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेली होती. कॅफेमध्ये पार्टी केल्यानंतर बिल देण्यासाठी पीडित तरुणीने डेबिट कार्ड दिले. मात्र, डेबिट कार्डचा पिन नंबर आठवत नसल्याने कॅफेचे बिल देता आले नाही. त्यामुळे कॅफे मॅनेजर व स्टाफने पीडित तरुणाला शिवीगाळ करुन हाताना मारहाण केली. तसेच तिच्याकडील तीन डेबीट कार्ड, हेडफोन, पॅनकार्ड, आधार कार्ड काढून घेऊन बिल दिल्यानंतर वस्तू परत देतो असे सांगून हॉटेलच्या बाहेर काढले.
त्यानंतर तरुणी कॅफेत थांबली होती. त्यावेळी कॅफेमधील एका ग्राहकाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला.
तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करून खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार केला.
तसेच याबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी दिली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी
तातडीने तपास करुन आरोपी दत्तात्रय खरात याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | खून करुन शीर धडावेगळे करणाऱ्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेप