Pune Crime News | लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेच्या घरात शिरुन तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पुण्यातील नानापेठेत घडली आहे. याप्रकरणी एकावर समर्थ पोलीस ठाण्यात (Pune Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2021 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 26 वर्षाच्या महिलेने रविवारी (दि.3) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी अनिल गायकवाड (रा. अशोक चौक, नाना पेठ) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीच्या काकाने 1 डिसेंबर रोजी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी महिलेच्या पती विरोधात आयपीसी 326, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न झाले असून आरोपी सनी गायकवाड याने वेळोवेळी त्यांच्या
घरी येऊन लग्नाची मागणी घातली. महिलेने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला असता सनी याने बघुन
घेण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरड करीत आहेत.

दरम्यान, सनी गायकवाड याच्या 83 वर्षीय काकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, पुतण्या सनी याचे महिलेसोबत
प्रेमसंबंध (Love Affair) आहेत. महिलेने त्याला भेटण्यास नकार दिल्याने तो महिलेच्या घरी भेटण्यासाठी गेला होता.
त्यावेळी महिलेचा पती त्याठिकाणी आला. पत्नीला भेटण्यासाठी आल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले.
महिलेच्या आरोपी पतीने त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण केली.
तसेच त्याठिकाणी पडलेला दगड त्याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार गोरड (PSI Akshay Kumar Gord) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार