Pune Crime News | कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुबाडले सव्वा लाख रुपये

पुणे : Pune Crime News | कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देतो, असा बहाणा करुन गुंगीकारक औषध देऊन तरुणीवर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून १लाख ३८ हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुमित बाळासाहेब जेबे (वय २६, रा. सिंधुदत्त, ढोले पाटील रोड, संगमवाडी) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार भांडारकर रोडवरील हॉटेल रणजित, हॉटेल अभिषेक, गोवा, लोणावळा, अलिबाग येथे ९ नोव्हेबर २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला कॉलेजला अ‍ॅडमिशन करुन देतो, या बहाण्याने सुमित जेबे याने ओळख करुन घेतली. तिला वेळोवेळी गुंगीकारक औषध पाजुन फिर्यादीवर बलात्कार केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर फिर्यादीचे फोटो घरच्यांना व सोशल मीडियावर व्हायरल करुन ठार मारण्याची धमकी
दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले.
फिर्यादीवर दबाव टाकून गुगल पेद्वारे १ लाख ३८ हजार ४१ रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जेबे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे
(Assistant Police Inspector Padole) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Rape of young woman by giving gungi drug on the pretext of getting admission in college; A quarter of a lakh of rupees was looted by threatening to make the photo viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

Shiv Thakare | मराठी चित्रपट न करण्याबद्दल शिव ठाकरेचे वक्त्यव्य; म्हणाला – ‘काही चित्रपटांसाठी माझी निवड…’

Pune Crime News | मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वानवडी पोलिसांकडुन अटक