Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने 5 लाख उकळले; कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका तरुणीवर बलात्कार (Rape) केला. तसेच वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली पाच लाख रुपये उकळल्याची घटना पुण्यातील कोथरुड परिसरात उघडकीस (Pune Crime News) आली आहे. याप्रकरणी एका युवकावर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तपन अनंत थत्ते Tapan Anant Thatte (वय-37 रा. कोथरुड) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तपन थत्ते याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच आई आजारी असल्याचे सांगून तिच्या उपचारासाठी (Medical Treatment) तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून तरुणीकडून पाच लाख रुपये उकळले.

 

तरुणीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच पीडित तरुणीला शिवीगाळ करुन धमावले. फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यावर
तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तपन थत्ते याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पुढील तपास गुन्हे शाखेचे (Crime Branch) पोलीस निरीक्षक पाटील (Police Inspector Patil) करीत करीत आहेत.

 

 

 

Web Title :- Pune Crime News | rape young woman lure of marriage five lakh rupees medical treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा