Pune Crime News | वेल्हेतील निर्घृण खुनाचे कारण आले समोर, ‘या’ कारणामुळे सपासप वार करुन, गोळ्या झाडून केला खून

वेल्हे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात युवकाचा गोळ्या (Firing) झाडून व धारदार चाकूने व सत्तुरने चेहऱ्यावर सपासप वार करुन खून (Velhe Murder Case) केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 12.10 च्या सुमार घडली. ही घटना (Pune Crime News) जमिनीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सुरेश नामदेव रेणुसे (वय 45 रा. पाबे ता. वेल्हे) यांनी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे Navnath alias Pappu Namdev Renuse (वय-38) याच्यावर गोळ्या झाडून व धारदार हत्यारांनी वार करुन खून करण्यात आला. हा प्रकार वेल्हे येथील हॉटेल विशाल येथे घडला. ज्ञानेश्वर उर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे याने सात ते आठ वर्षापूर्वी मरळ आवाडातील जमीन खरेदी केली होती व तीच जमीन पुन्हा खरेदी केली. त्या जमिनीबाबत पहिल्या पार्टीची कोर्टात केस सुरु होती.

 

या जमिनीबाबत मृत पप्पू रेणुसे हा लोकांना एकाचे दोन सांगत असल्याचा संशय माऊली रेणुसे याला होता.
त्याचा राग मनात धरुन आरोपीने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने पप्पू रेणुसे याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून
आणि धारदार शस्त्राने चेहऱ्यावर सपासप वार करुन निघृण खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पवार (Police Inspector Manoj Pawar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | reason for the gruesome murder in velhya revealed killed by shooting stabbing the face with a sharp knife pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Politics | ‘दादा… पुणेकरांना वाचवा’; काँग्रेस नेत्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पत्र (व्हिडिओ)

Maharashtra Politics | संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते…, शिंदे गटाचे टिकास्त्र

Aurangabad ACB Trap | दारु विक्रीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी, दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात