येरवडा कारागृहातून बाहेर येताच ‘भाई’चं जंगी स्वागत, पोलिस सुस्त (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असताना त्या वेळच्या ‘खराब’ वातावरणात एका तथाकथित ‘डॉन’ व त्याच्या साथीदारानी सांगली येथील कुविख्यात गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच जिल्ह्यात उदयास येऊ लागल्या एका नव्या भाईच कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जंगी स्वागत करत “टिकटॉक”वर व्हिडिओ टाकत पोलिसांनाच ‘आव्हान’ दिले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच लक्ष नाही की पाहूनही डोळे झाक केली जात आहे, हे कळण्यास मार्ग नाही. आप्पा उर्फ तुषार गोगावले असे कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत झालेल्या आणि मिरवणूक काढण्यात आलेल्या ‘भाई’च नाव आहे.

गोगावले याच्यावर ग्रामीण पोलिसांत एक खुनाचा आणि सिंहगड पोलीस ठाण्यात एक असे दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भोर तालुका अध्यक्ष नेता विजय मिरगे याचा २४ डिसेंबर २०१६ रोजी जमिनीच्या वादातून खून झाला होता. तर सिंहगड परिसरातही पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. त्याचवेळी सांगली येथील कुविख्यात गुंड मोहमंद जमाल नदाफ हा 2015 पासून मोकाच्या गुन्हयात येरवडा कारागृहात होता. त्यावेळी काही महिन्यांपूर्वी राज्यात सुरू असणाऱ्या खराब वातावरण मुळे कारागृहात तुषार हांबिर, श्वेत्या निकाळजे, दीपक पाटील, गणेश मासलकर आणि आप्पा गोगावले यांनी कारागृहात नदाफ याच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कारागृह प्रशासनाने त्याची नाशिक कारागृहात रवानगी केली होती.

या गुन्ह्यात गोगावले दोन दिवसांपूर्वी कारागृहातुन सुटून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर गोगावले याच्या चाहत्यांनी त्याचे भुगावमध्ये जंगी स्वागत करत त्याचे चित्रीकरण केले आणि TikTok ला टाकले आहेत. मात्र याकडे स्थानिक व LCB च्या पोलिसांना पाहण्यास वेळ नसल्याचे दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/