Pune Crime News | दहशत माजवणाऱ्या पुण्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची दुसरी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिवाजीनगर, हडपसर, फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही दुसरी कारवाई आहे.

 

ऋषीकेष सुनील बागुल (वय-24 रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिस्टल, कोयता, गुप्ती, सुरा या सारख्या हत्यारांसह फिरताना गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. तसेच परिसरात दहशत माजवली आहे. मागील पाच वर्षात त्याच्यावर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime News)

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Senior Police Inspector Shabbir Sayyed) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद,
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Surekha Waghmare) यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime News | Retention action against terror-inflicted innkeeper in Pune, CP Ritesh Kumar’s second action under MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण