Pune Crime News | कारच्या धडकेत रस्ता सफाई करणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे -सासवड रोडवरील सातववाडी येथील घटना

पुणे : Pune Crime News | सकाळी रस्ते साफसफाई करुन नागरिकांची सोय करणार्‍या सफाई कर्मचारी महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Pune Accident News) महिलेचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime News)

छाया भजनदास शिंदे Chhaya Bhajandas Shinde (वय ४२, रा. आकाशवाणी, हडपसर – Akashvani, Hadapsar) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात सासवड रोडवरील सातववाडी (Satavwadi Saswad Road) येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छाया शिंदे या रस्ता झाडण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सातववाडी येथे त्या काम करत होत्या. पुण्याहून सासवडच्या दिशेने जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटले. कारने दुभाजकाला प्रथम धडक दिली. त्यानंतर झाडाला धडकून त्याने छाया शिंदे यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलविला असून पोलीस (Pune Police) कारचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Road sweeper killed in car collision; Incident at Satavwadi on Pune-Saswad Road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | काल ‘सागर’ बंगल्यावर खलबतं, एकनाथ शिंदे पाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना;
राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Politics News | जावळीत राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना धक्का,
ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश