पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कर्वेनगरमधील बोळात मध्यरात्री घरी जात असलेल्या तरुणाला अडवून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जीव मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) करुन लुबाडणार्या तिघांना वारजे पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली. (Pune Crime News)
सौरभ पवार, राहुल चव्हाण आणि कुमार चव्हाण (रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत तुषार ज्ञानदेव धनवटे (वय २३, रा. इंगळे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील मावळे आळीत ३० जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अमित असे त्यांच्या मावशीच्या घरी जात होते.
त्यावेळी बोळामध्ये सौरभ पवार याने त्यांना अडविले. त्यांच्या खिशातील ९६० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
फिर्यादी यांनी विरोध केल्यावर राहुल चव्हाण याने त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले.
त्यांनी फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केलयाचा गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
Web Title :- Pune Crime News | Robbed a young man by hitting him on the head with a beer bottle; Incident in Karvenagar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू