
Pune Crime News | फ्लॅटच्या बाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात, पुण्यात चोरट्यांनी घर साफ केलं
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फ्लॅटच्याबाहेरील बुटात ठेवलेली चावी घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी (Burglary) करुन घरातील वस्तू चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत घडला आहे. चोरट्यांनी घरातील काही वस्तू आण हेडफोन चोरुन नेले आहेत. हा प्रकार 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री अकरा या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरामध्ये अनेक विद्यार्थी कॉट बेसिसवर किंवा भाड्याने फ्लॅट घेऊन राहतात. फिर्यादी देखील मित्रांसह बालाजी हाइट्स परिसरात राहतात.
घटनेच्या दिवशी फिर्यादी हे फ्लॅट बंद करुन बाहेर गेले होते.
त्यावेळी त्यांनी फ्लॅटची चावी इतर मित्रांसाठी फ्लॅटच्या बाहेरील बुटात ठेवली होती.
याच चावीने अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप उघडले.
चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातील काही वस्तू व हेडफोन चोरुन नेले.
रात्री अकरा वाजता फिर्यादी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dheeraj Gupta) करीत आहेत. (Pune Crime News)
फ्लॅटमध्ये किंवा कॉट बेसिसवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाकडे एक स्वतंत्र चावी ठेवावी.
आपल्या सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांच्या सोयीसाठी चावी बुटात, कुंडी खाली किंवा इतरत्र चावी लपवून ठेवणे महागात पडू शकते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update