Pune Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये हुल्लडबाजांकडून 20 वाहनांची तोडफोड; आरोपी पोलिसांना धक्काबुक्की करून रिक्षातून झाले फरार

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad New Year) गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे (Pimpri Chinchwad Crime News). सर्वत्र नूतन वर्षाचे स्वागत होत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी (Sangvi Police) आणि वाकड पोलिस (Wakad Police) ठाण्याच्या हद्दीत हुल्लडबाजांकडून राहटणी (Rahatni) आणि पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) परिसरात मध्यरात्री तब्बल 20 हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हुल्लडबाजांकडून कोयते आणि सिमेंटच्या गट्टूनी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

शनिवारी 31 डिसेंबर रोजी रात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देतात आणि नूतन वर्षाचे स्वागत करतात. त्यासाठी ठिकठिकाणी विध कार्यक्रमांचे तसेच पाटर्यांचे आयोजन केले जाते. कुठेही अनुचित घटना, प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपुर्ण शहरात कडेकोठ बंदोबस्त तैनात केला जातो. सालाबादाप्रमाणे यंदाही पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त होता. मात्र, रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हुल्लडबाजांकडून तब्बल 20 हून अधिक दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

वाकड पोलिसांनी हुल्लडबाजांच्या मुसक्या आवळण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र डांगडिंग करणार्‍या हुल्लडबाजांनी पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून पळ काढला आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या चित्रीकरणावरून संबंधित समाजकंटकांचा शोध घेत आहेत. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

अशा प्रकारच्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळयाचे मोठे आव्हानच आता पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात इतरत्र किरकोळ घटना सोडल्या तर सर्वच ठिकाणी नव वर्षाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले आहे.
घडलेल्या वाहनांच्या तोडफोडीबाबत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिकचा तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | sadakchap gang vandalized 20 vehicles in
pimpri chinchwad sangvi wakad rahatni pimple saudagar pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा