Pune Crime News | सदाशिव पेठ: हातगाडी लावण्यावरुन तळणीची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादात महिलेला मारहाण (Beating) करुन तिच्या पतीच्या डोक्यात वडा पाव तळण्याची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याबाबत दिपाली गणेश मगर (वय २८, रा. कारगील सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०७/२३) दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पूर्वी ज्ञान प्रबोधिनीसमोरील बाजूला हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करत होत्या.
फिर्यादी या हातगाडी पुन्हा लावत होत्या. त्यावेळी हातगाडी मालकीण कल्पना जाधव याही तेथे होत्या.
यावेळी जागेवरुन आरोपींनी येथे हातगाडी लावू नये या कारणावरुन वाद घातला.
फिर्यादी व हातगाडी मालकीण कल्पना जाधव यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांचे पती गणेश मगर यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई मारुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक फरताडे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Low Weight | वजन कमी झाल्याने सुद्धा वाढू शकतात आनेक समस्या, ऑस्टियोपोरोसिस, अ‍ॅनीमियासह होऊ शकतात हे 5 रोग