
Pune Crime News | सहकारनगर: कोयत्याने वार करुन 17 वर्षाच्या मुलाचे बोटच तोडले
पुणे : Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत झालेल्या बाचाबाचीतून चौघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलावर कोयत्याने (Koyata) वार करुन डोक्यात वार केला. वार चुकविण्यासाठी त्याने हात मध्ये घातला. हा वार इतका जोरात होता की त्यात त्याचे बोटच तुटून पडले. (Pune Crime News)
या घटनेत राज कैलास चंडालिया (वय १७, रा. इंदिरा गांधी सोसायटी, पदमावती) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police Station) चार अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार तळजाई वसाहतीत शनिवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीत फिर्यादी आणि आरोपी यांच्यात बाचाबाची झाली होती.
फिर्यादी हे मित्रांसमवेत बोलत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन चौघे जण आले. त्यांची तोंडाला रुमाल बांधला होता.
फिर्यादीस शिवीगाळ करुन याला खूप माज आला आहे. हा आपल्याला खुन्नस देतो, याला आज संपवून टाकायचे, असे म्हणून त्यांच्याकडील धारदार हत्याराने मारहाण केली. त्यांनी कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी तो वाचविण्यासाठी हातमध्ये घातला. त्यात त्याच्या हाताचे बोट तुटले. फिर्यादी हा गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक खंडाळे (PSI Khandale) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Srinivas Patil | शरद पवार हे नास्तिक नाहीत, खासदार श्रीनिवास पाटलांकडून आरोपांचं खंडन
NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे सूचक विधान, म्हणाले-‘राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे ते…’