
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर बलात्कार
पुणे : Pune Crime News | तुझ्यावर माझे प्रेम आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये (Sahakar Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ पवार (वय २१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी आरोपी सोमनाथ पवार हा रहात होता.
त्याने फिर्यादीस माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे सोबत लग्न करशील का अशी विचारणा केली. तेव्हा तिने नकार दिला.
तरीही तिला आपल्या गाडीवर बसवून घरी साडतो असे सांगून स्वत:च्या घरी नेले (Crime Against Woman).
जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध केला. कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध (Physical Relation) केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्यादी दिली असून पोलीस उपनिरीखक राजगुरु (PSI Rajguru) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Sahakarnagar Police Station – Rape On Minor Girl in Annabhau Sathe Colony, Aranyeshwar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update