Pune Crime News | पोलीस, पत्रकार असल्याचे सांगून महिलेला लुटणाऱ्या टोळीतील आरोपींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी (Anti Corruption Bureau) आणि पत्रकार (Journalist) असल्याचे सांगत एका टोळक्याने महिलेला लुटले होते. त्यांनी महिलेच्या घरात घुसून ती वेश्याव्यवसाय (Prostitution) करत असल्याचा आरोप करुन महिलेकडून 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (gold jewelry) व 14 हजार रुपये रोख असा एकूण 84 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. हा प्रकार बालाजीनगर येथील एका सोसायटीमध्ये 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री घडला होता. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

सिमा शशिकांत शिंदे (वय-30 रा. इंदिरानगर चाळ, बिबवेवाडी), रमेश सिताराम कंक (वय-35 रा. मानाजीनगर, नऱ्हे), स्वप्नील संतोष काळे (वय-19 रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), कार्तीक संतोष कांबळे (वय-21 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक) यांना अटक (Arrest) केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्या इतर पाच साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बापु खुटवड, बजरंग पवार यांना गुन्ह्यातील महिला आरोपी सिमा शिंदे ही के.के. मार्केटच्या (K.K. Market) पुढे असलेल्या नर्सरी जवळील एका सोसायटीसमोर उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन महिलेला शिताफिने ताब्यात घेतले.

सिमा शिंदे हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने व तिच्या साथीदारांनी तोतया पत्रकार व पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच तिचे साथीदार नऱ्हे येथे असल्याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने नऱ्हे येथून एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 35 हजार रुपये किंमतीचे दागिने, पाच हजार 500 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा एकूण 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर गुन्ह्यातील इतर पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण
(ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर
(Senior Police Inspector Savalaram Salgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende), पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे,
सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, शिंदे,
महिला पोलीस अंमलदार रामगुडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Sahkarnagar police arrested the accused in the gang who robbed the woman claiming to be policemen and journalists

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना