Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पायी जाणार्‍यांची रेकी करून नंतर मोटारसायकलवरून येवुन पत्ता विचारण्याचा बहाणा करत नंतर माझे चुकले तुमच्या पाया पडतो असे म्हणुन पाया पडण्याचे नाटक करतानाच झटापट करून संबंधिताच्या खिशातील पैसे नकळत काढून चोरी करणार्‍या तडीपार गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून पोलिसांनी त्याच्याकडून साडेतीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे (22, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, समर्थ पोलिस ठाण्यात दि. 18 जानेवारी 2023 रोजी पत्ता विचारण्याचा बहाणा करून व पाया पडण्याचे नाट करून खिशातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती. समर्थ पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि त्यांच्या पथकातील पोलिस हे रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे असलेले आरोपी तसेच तडीपार गुन्हेगारांची झाडाझडती घेत होते. त्याअनुषंगाने पोलिस अंमलदार श्याम सुर्यवंशी यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये तडीपार आरोपी निखील कांबळे हा चोरी करताना दिसला. दि. 2 फेब्रुवारी रोजी आरोपी कांबळे हा समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना म्ळिाली. त्याचा शोध घेवुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. (Pune Crime News)

आरोपी कांबळे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने 3 गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून एक टेम्पो व एक रिक्षा असा एकुण साडेतीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill),
फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे (Sr PI Ramesh Sathe),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare)
यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare),
पोलिस अंमलदार श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, रहिम शेख, दत्तात्रय भोसले, अर्जुन कुडाळकर, जितेंद्र पवार,
सुभाष पिंगळे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहिदास वाघिरे, कल्याण बोराड, ज्ञानेश्वर सुर्यवंशी आणि बर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Samarth Police Arrest Criminal And Solve Three Cases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास